नाशिक: सरकार वाडा भागातील ठक्कर बाजार बस स्थानक येथून गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी
Nashik, Nashik | Nov 1, 2025 सरकार वाडा भागातील ठक्कर बाजार बस स्थानक येथून गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी केल्याची घटना दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळी घडली असून 31 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजता सरकार वाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लता अशोक शेंगळे राहणार मुंबई या ठक्कर बाजार बस स्थानक येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी केली.