निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी मतदान केंद्राची पाहणी करत आढावा घेतला, माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया
बीड शहरात होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - सन 2025 च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी, बीड यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी व सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा त्यांनी सखोल अभ्यास केला. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवरील भौतिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रांची उपलब्धता, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी असलेल्या विशेष सोयी-सुविधा, सर्व गोष्टींचा आढावा घेतला.