अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्यांची यांची दहशत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, व्हिडिओ आला समोर
अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गर्दूल्यानी यांनी दहशत माजवली आहे. नशा करून गर्दुल्ले रेल्वे स्टेशन परिसरात येतात आणि महिला ट्रेनची वाट बघत असताना त्यांच्याजवळ जाऊन उभे राहणे,पाहणे, बडबडणे अशा गोष्टी करतात. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्री उशिराच्या सुमारास एक गर्दुल्ला नशे मध्ये असताना महिलांजवळ जाऊन उभा राहत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावरून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळत आहे.