नागपूर ग्रामीण: 12 फूट खोल टाकीतून आठ दिवसानंतर सापाची यशस्वी सुटका, बेलतरोडी येथील घटना
11 नोव्हेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या समोरील 12 फूट खोल टाकीत एक बिनविषारी पानदिवड सापडला होता. गेल्या आठ दिवसांपासून हा साप टाकीतच अडकला होता. येथील कामगार राजेंद्र बर्गट यांनी सर्व मित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि टाकीत उतरून त्या सापाला. आठ दिवसांपासून उपाशी असल्याने साप खूप कमजोर झाला होता त्याला बाहेर काढल्यानंतर पाणी पाजण्यात आले.