श्रीगोदा नगर रोड वरील बांबुर्डी घुमट फाटा जवळ पहाटे बसला भीषण आग; अग्निशमन दलाची तत्पर कामगिरी नगर : श्रीगोदा नगर रोडवर बांबुर्डी घुमट फाटा परिसरात आज पहाटे ३.१० वाजता पुणे–बीड बसमध्ये अचानक भीषण आग भडकली. आग वेगाने पसरत असल्याने काही क्षणातच बसचा मोठा हिस्सा जळून खाक झाला. परिसरात अलर्टची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर महापालिका अग्निशमन दलाचे पथक वाऱ्याच्या वेगाने घटनास्थळी दाखल झाले.