रामटेक: राष्ट्रीय महामार्गावरील वडंबा येथील ट्रॅव्हल्स, ट्रक व कारच्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू, 10 प्रवासी जखमी
Ramtek, Nagpur | Oct 29, 2025 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच बुधवार दि. 29 सप्टेंबरला दु. दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या वडंबा येथील ट्रॅव्हल्स, ट्रक व कारच्या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हल्स मधील दहा ते बारा प्रवासी जखमी असल्याची माहिती देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी दिली. मदतकार्य सुरु असल्याने पूर्ण व स्पष्ट माहिती लवकरच हाती येईल.