रामटेक: कारवाही येथे अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्या आरोपी विरुद्ध देवलापार पोलिसात गुन्हा नोंद
Ramtek, Nagpur | Nov 7, 2025 पो. स्टे. देवलापार अंतर्गत येणाऱ्या करवाही येथील आरोपी नंदकिशोर वासुदेव कोकोडे, वय 40 वर्ष याने स्वतःच्या घराचे मागच्या परसबागेत अवैधरित्या गांजाच्या झाडाची लागवड केल्याच्या गुप्त माहितीवरून देवलापार पोलिसांनी गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबरला सायंकाळी पंचा समक्ष पाहणी केली असता परसबागेत सहा नग गांजा सदृश्य वनस्पती मिळून आल्याने देवलापार पोलिसांनी नंदकिशोर ला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.