चिखली: तारखेवर गैरहजर आरोपींना थेट बुलढाणा कारागृहाची वाट, अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत केले होते गुन्हे
“कायद्याला चुकवता येईल असा भ्रम बाळगणाऱ्यांचा शेवट नेहमीच गजाआड होतो”, हे वाक्य मंगरूळ नवघरे न्यायालयाच्या आदेशानंतर खरी ठरले. न्यायालयीन तारखेला वारंवार गैरहजर राहिलेल्या आरोपींना अखेर अमडापूर पोलिसांनी गजाआड करत थेट बुलढाणा जिल्हा कारागृह दाखल केले.अमडापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सपोनि निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली एन. बी. डब्ल्यू. वॉरंटमधील फरार आरोपींना पकडण्यात आले.