न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे अखेर कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आज ३० नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे.दिनांक 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे.आयोगाने नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया पार पडणार असल्याने 4 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर तर अर्ज माघारी 10 डिसेंबर तर 11 डिसेंबर ला उमेदवारांची यादी जाहीर होणार असून मतदान 20 डिसेंबर तर मतमोजणी होणार आहे