मेहकर: संतनगरी मेहकरच्या प्रगतीसाठी, भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
संत-महंतांच्या वास्तव्याने पावन नगरी मेहकरची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून नगर परिषदेवर भाजपाची प्रगतिशील सत्ता आवश्यक आहे. या उद्दिष्टासाठी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मेहकर येथे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी भाजपाच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखत घेतल्या.यावेळी मेहकर व लोणार येथील इच्छुक उमेदवारांनी आपल्या संपूर्ण कार्याचा आढावा बैठकीदरम्यान सादर केला.