सातारा: सातारा नगरपालिकेसमोर एसटी बस बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी
Satara, Satara | Nov 6, 2025 सातारा – नगरपालिकेसमोर वर्दळीच्या ठिकाणी एसटी बस बंद पडल्यामुळे आज गुरुवार, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी वाहतूक कोंडी झाली. दुपारी बारा वाजल्यापासून सुमारे दोन वाजेपर्यंत ही बस रस्त्याच्या मध्यभागी उभी राहिली होती. सातारा शहरात एसटी बस वारंवार बंद पडण्याचे प्रकार वाढल्यामुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.