सारसनगर येथे राज्य सरकारच्या माध्यमातून नगरकरांच्या हक्काचे अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे या ठिकाणी विविध खेळांची मैदानी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे तयार करण्यात आली आहे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रशिक्षकाचे देखील नेमणूक करण्यात येणार आहे या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे