हवेली: घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला गावठी पिस्तुल व सोन्याच्या दागिन्यांसह अटक, गुन्हे शाखा युनिट 6 ची धडाकेबाज कारवाई
Haveli, Pune | Nov 11, 2025 हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अग्निशस्त्र व जिवंत काडतूस व सोन्याच्या दागिन्यांसह ताब्यात घेतले आहेत.हंसराज सिंग उर्फ हँसू रणजित सिंग टाक, (वय 19, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.