उदगीर: प्लॉट घेण्यासाठी अंबाजोगाई येथील विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ,सासरच्या आठ लोकांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Udgir, Latur | Sep 17, 2025 अंबाजोगाई येथे सासरी नांदत असलेल्या विवाहितेचा माहेरहून प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या लोकांनी छळ केला याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फिर्यादीस आरोपीने संगनमत करून लग्ना नंतर सहा महिन्यांनी तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, तू पसंद नाहीस तुच्या घरच्यांनी हुंडा दिला नाही तू प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर हाकलून दिले