बार्शी: जवळगाव प्रकल्पावर पर्यटकांच्या जीवाला धोका; संरक्षक ग्रील तातडीने बसवण्याची मागणी
Barshi, Solapur | Sep 17, 2025 बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच पावसामुळे तालुक्याचा महत्त्वाचा जवळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या भिंतीवर संरक्षक ग्रील नसल्यामुळे पर्यटकांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असून, कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकतो. तरी या प्रकल्पावर संरक्षक ग्रील तातडीने बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी १७ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास केली आहे.