चांदूर रेल्वे: जावरा येथे मालवाहू गाडीची स्टेफनी अज्ञात चोरट्याने केली चोरी
विजय ज्ञानेश्वर नंदेश्वर वय वर्ष 38 राहणार जावरा यांनी अद्यात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. रमाई चौक जावरा येथे घराच्या बाजूला लावलेली बुलेरो पिकप मालवाहू गाडीची स्टेफनी अंदाजे किंमत बारा हजार रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार तळेगाव दशासर पोलिसात विजय यांनी दिली आहे. तेव्हा अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमाने तळेगाव दशासर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.