चिखली: सहकारातून जनतेचा उद्धार साधणार्या श्री बालाजी सूतगिरणीस कामगार मंत्री मा. ना. श्री. आकाशदादा फुंडकर यांची सदिच्छा भेट
ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी पांग्री (दगडवाडी फाटा, ता. देऊळगाव राजा) येथे सहकार तत्त्वावर उभारलेल्या श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला महाराष्ट्राचे कामगार मंत्री मा. ना. श्री. आकाशदादा फुंडकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन सूतगिरणीच्या कार्याचा आढावा घेतला.या वेळी मा. मंत्रीमहोदयांचे स्वागत व सत्कार करून त्यांना सूतगिरणीच्या स्थापनेपासून आजवरच्या यशस्वी वाटचालीची महाले दाम्पत्यांनी माहिती दिली.