कोरेगाव: किन्हईच्या यात्रेत चोरट्यांचा डल्ला; एसटी बस थांब्याच्यासमोर असलेल्या घरातून ८६ हजारांचा ऐवज लंपास
किन्हई गावातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिक साजरेपणात मग्न असतानाच चोरट्यांनी नामी संधी साधत एसटी बस थांब्याच्या समोर असलेल्या एका घरात हात साफ केला. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हेमा मुकुंद होळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरी केली.