तुमसर: शहरातील रविदास नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे आरोग्य शिबीर संपन्न
तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे व मित्र परिवारतर्फे चालता फिरता दवाखान्या अंतर्गत इंजी.सागर गभने यांच्या नेतृत्वात आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता दरम्यान करण्यात आले होते. या शिबिराला तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने येऊन सर्व रुग्णांची तपासणी केली. शिबिरामध्ये शरीरा संबंधित विविध तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने, जवळचे चष्मे, औषधी, आयड्रॉप निशुल्क वाटप करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, रविदास नगर येथे...