शिरूर कासार: जिल्ह्यात रायमोहा येथील मतिमंद विद्यालयाच्या गेट समोर मुलांच्या टोळक्याकडून विद्यार्थ्याला जबरी मारहाणीचा व्हिडिओ वायरल
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे. शालेय विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्याच टोळक्याकडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असून असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. शिरूर तालुक्यातील रायमोह येथे अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली