अमरावती: भाजप आमदार प्रवीण तायडे यांची तीव्र प्रतिक्रिया, बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणी
भाजप आमदार प्रवीण तायडे यांची तीव्र प्रतिक्रिया, बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणी वादग्रस्त आणि धाडसी वक्तव्ये करून मा. आ. बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या टिपणीवर न्यायालयानेसुद्धा त्यांना फटकारले होते.आता कडू यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू लोकांची डोके भडकावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली