*अमरावती : चित्रा चौक ते इर्विन चौक व गांधी चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमणांवर मोहीम; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार कारवाई अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चित्रा चौक ते इर्विन चौक आणि गांधी चौक परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे