धुळे: बिलवाडी हत्याकांड प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी, गोपाळ समाजहित महासंघाचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Dhule, Dhule | Sep 17, 2025 जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी येथे १४ सप्टेंबर रोजी एकनाथ निंबा गोपाळ यांची रोहिदास पाटीलसह नऊ जणांनी निर्घृण हत्या केल्याच्या आरोपांतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या संदर्भात गोपाळ समाजहित महासंघाच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गावातील काही व्यक्तींकडून समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात संरक्षण मिळावे व संबंधित आरोपींना त्वरीत शिक्षा करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.