पाटोदा: दासखेड फाट्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील एक जण ठार
Patoda, Beed | Nov 23, 2025 मराठा सेवक अतुल घरत यांचे अपघाती निधन झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे एका चारचाकी स्विफ्ट गाडीने अतुल घरत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर अतुल यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातातील स्विफ्ट कारच्या मागे अण्णा असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे हा केवळ अपघात नसून घातपात असण्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. हा 'किंग अण्णा' कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे