अमरावती: प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून गाडगे नगर पंचवटी उड्डाणं पुलाखाली युवक काँग्रेसने केला साजरा
आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियान सुद्धा अमरावतीत राबविला जात आहे. आज १७ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी दीड वाजता युवक काँग्रेस वतीने मात्र नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. गाडगे नगर पंचवटी उड्डाणं पुलाखाली युवक काँगेस पदाधिकारी नी भजे तळून विक्री करण्यात आली. बेरोजगाचा वाढल्याचा आरोप करत भाजपा सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला....