अमरावती: संजय सातारकर आजही जपतात बहुरूपी लोककला,
लोप पावत चाललेली कला परंपरा आजही जिवंत
सोशल मीडियाच्या युगात आणि धकाधकीच्या जगात बहुरूपी बनून लोकांचं मनोरंजन व प्रबोधन करणारे अमरावती चे संजय सातारकर यांनी या लोककलेला जिवंत ठेवले आहे. वयाच्या 50 वर्षातही ते आज रोज सकाळी मेकअप करतात तर कधी महादेव कधी वासुदेव तर कधी हनुमान तसेच ओठांवर भक्तीगीत आणि मनात लोक जागृतीचा संदेश घेऊन ते गावोगाव फिरतात. संजय सातारकर हे अमरावती च्या आष्टी गावातील रहिवाशी असून त्याच्या घराण्याची ही परंपरा आजोबापासून सुरू आहे. आणि समाजात प्रबोधन करणे सुरूच आहे.