परभणी: पोखर्णी फाटा येथे मध्य प्रदेशच्या नागरिकाला बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात
पोखर्णी फाटा येथे मध्य प्रदेश येथील नागरिकास डुप्लिकेट सोने देऊन साडेचार लाख रुपये घेऊन फसवणूक करून पसार झालेल्या आरोपीस गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ अटक केली व साडेचार लाख रुपये हस्तगत केले अशी माहीती स्थानीक गुन्हे शाखेने बुधवारी दिनांक 17 रोजी दुपारी एक वाजता दिली.