अमरावती: इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे अमरावतीत फलक लागल्याने अमरावतीत भाजप आक्रमक
आज 13 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी साडे तीन वाजता भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यसभा खासदार व भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठून आपला संताप व्यक्त केला. शहरात लागलेले बॅनर पोलिसांना का दिसत नाही? लव्ह जिहाद निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत आहे. जिहादी रॅकेट उध्वस्त केले पाहिजे,याचे धागेदोरे राष्टविघातक शक्तींशी जोडल्या गेले आहे,यावर कारवाई करण्याची मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली.