चंद्रपूर: भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष.पैसे वाटतांना व्हिडीओ व्हाॅयरल.
राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील भाजप नेते पांडूरंग सावकार चिल्लावार हे निवडणूकीत ५०० रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने येथे खळबळ उडाली आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे तक्रार काॅग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी केली आहे, मात्र अद्याप यावर काही कार्यवाही विषयी माहिती मिळू शकली नाही.