धामणगाव रेल्वे: जुना धामणगाव येथे मनोज बाबा आनंदात विलीन; भक्तांवर दुःखाचे डोंगर कोसळले ;यवतमाळ जवळील तळेगाव भारी येथे समाधी
मनोज बाबा हे आजनसरा येथे भक्तांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात पुलगावजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. तत्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मनोज बाबा हे मूळचे जुना धामणगाव येथील असून लहान वयातच त्यांच्या अंगी असलेल्या दिव्यशक्तीमुळे लोक त्यांना “बाल योगी” म्हणून ओळखू लागले. प्रारंभी काहीजण त्यांची थट्टा करत असले तरी त्यांच्या चमत्कारांनी नागरिकांना त्यांच्या शक्तीची प्रचिती आली. सांगण्यात येते की, पाण्यावर वाहन