नागपूर ग्रामीण: वाडी नगरपरिषद निवडणुकीत युवा मतदार केंद्राचा विशेष पुढाकार
वाडी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी एक विशेष आणि स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवकांना मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने, मतदान केंद्र क्रमांक १३ येथे 'युवा मतदार केंद्र' उभारण्यात आले आहे.युवा मतदारांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे केंद्र खास तयार करण्यात आले आहे.