कल्याण: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार, डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Kalyan, Thane | Nov 9, 2025 डोंबिवली येथील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा डोंबिवली मध्ये पार पडला. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल मनोगत व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार अस ते म्हणाले.