धामणगाव रेल्वे: सावळा येथे युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
धामणगांव रेल्वे तालुक्यातील सावळा गावात एक धक्कादायक घटना घडली. दत्ता यादवराव कुमरे (वय 32) या तरुणाने गावाच्या हद्दीतील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.प्राथमिक माहितीनुसार, मृतक शेतमजूर म्हणून काम करीत होता. तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली, मात्र त्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. गावातील लोक विहिरीजवळ गेले असता, पाण्यात मृतदेह दिसून आला. तातडीने ग्रामस्थांनी पोलिसा