पुसद: तालुक्यातील पांदण रस्त्याची दुरवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष ; गोर सेना जिल्हाध्यक्ष जय राठोड
पुसद तालुक्यातील अंतर्गत रस्ते चिखलमय तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभालीअभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे.