आज दिनांक 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील तहसील परिसरात असलेल्या गायरान धारकांच्या उभ्या पिकावर बदनापूर तहसीलदारांनी जेसीपी चालवत अतिक्रमण काढले आहे. हे 50 ते 60 अतिक्रमण धारक मागील कित्येक वर्षापासून या गायरान जमिनीवर आपली उपजीविका भागवत परिवाराचा उदरनिर्वाह करत होते मात्र या तहसीलदारांनी महसूल विभागाने आज त्यांच्या शेतात असलेली कपाशी तूर या उभ्या पिकांवर जेसीबी चालवत अतिक्रमण काढले आहे,त्यामुळे या अतिक्रमण धारकांचे डोळे पानवले आहे.