धारूर: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवलेल्या महिलेचा मृत्यू, धूनकवड फाटा येथील घटना
Dharur, Beed | Nov 25, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे (वय ३०) यांचा उपचारादरम्यान आज मंगळवार दि.25 नोव्हेंबर रोजी, सकाळी 11:30 च्या सुमारास मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ही घटना उपमुख्यमंत्री अजित पवार परतूरहून उस्मानाबाद दिशेने जात असताना तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे घडली होती. धडकेत पती विष्णू सुदे, तसेच दोन लहान मुली – रागिणी वय ९ वर्ष व अक्षरा वय ६ वर्ष गंभीर जखम