कारंजा: न.प निवडणूक🗳️
बोधचिन्हांचे वाटप! अध्यक्ष व सदस्य पदाचे उमेदवार.
Karanja, Washim | Nov 27, 2025 कारंजा येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या कारंजा नगरपरिषद निवडणुकीतील मान्यताप्राप्त, अमान्यताप्राप्त व अपक्ष नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी बोधचिन्हांचे वाटप करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत हा कार्यक्रम घेण्यात आला. चिन्ह वाटप होताच उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपस्थित होते.