हिंगणघाट: ऐन नगरपालिकेच्या निवडणूकीच्या मतदानाचा २ दिवसापूर्वी उबाठाला धक्का: शहर प्रमुख चंद्रकांत भुते सह अनेकांचा भाजपात प्रवेश
हिंगणघाट:२ डिसेंबर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणूक अवघ्या दिवसावर येऊन ठेपली असतांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत भुते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचे कार्यशैलीने प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश घेतला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा ज्येष्ठ नेते किशोरभाऊ दिघे, डॉ. उमेश तुळसकर भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे आदी उपस्थित होते.