यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता प्रारूप मतदार याद्या हरकती व सूचनाकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. संबंधित याद्यांवर प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांचा विचार करून, आता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती उपनिवडणूक अधिकारी (ग्रा. पं. नि.), जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी दिली आहे.