चिखली: राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांची माफी मागावी–रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर
राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांची माफी मागावी–रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येत आहे. याचा विचार सरकारने करायला हवा. आपणच बँक काढायचे बँक बुडवायच्या आणि परत बॅंक काढायच्या हे कुठपर्यंत चालणार. शेतकऱ्यांबद्दल विखे पाटलांनी वक्तव्य केले ते अशोभनीय असून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी अशा प्रकारची अपेक्षा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.