येथील श्रीराम वार्ड परिसरातील हनुमान मंदिराजवळ व्हॅनची धडक बसून ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १९ घडली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. विमल राजाराम वासलवार (६९) असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतक विमल वासलवार ही महिला दाबेलीच्या दुकानात मजुरीचे कामावर होती.