कल्याण: मराठी येत नाही म्हणून नशेखोर तरुणांच्या टोळक्याने नेपाळी कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉटेलची केली तोडफोड, CCTV आला समोर
Kalyan, Thane | Nov 11, 2025 कल्याण परिसरातील चक्की नाका येथे नशेखर तरुणांनी एका हॉटेलची तोडफोड करत नेपाळी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेले आणि त्यानंतर काउंटरवर असलेल्या नेपाळी कर्मचाऱ्यांना मराठी का येत नाही असा सवाल उपस्थित करत नशेखर तरुणांच्या टोळक्याने हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आला आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.