तिरोडा: आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरोड्यात भव्य प्रचार रॅली
Tirora, Gondia | Nov 29, 2025 नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तिरोडा शहरात नगरपरिषद अध्यक्ष आणि संबंधित वॉर्डाच्या निवडणुकीनिमित्त एका भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विशेष म्हणजे,याप्रसंगी स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांची प्रमुख उपस्थिती होती,ज्यामुळे रॅलीला अधिक बळ मिळाले.रॅलीमध्ये सहभागी झालेल्या जनसमुदायामध्ये उत्साह, ऊर्जा आणि विकासाच्या संकल्पनेमुळे एक सकारात्मक वातावरण दिसून आले.नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे ही प्रचार रॅली यशस्वी ठरली