विक्रमगड: ओला दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांना हेक्टरी50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या;काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांची मागणी
कित्येक दिवसांपासून अवकाळी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात देखील अवकाळी पाऊस व पूरक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, कर्जमाफी करण्यात यावी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली आहे.