नाशिक: फिरत्या अन्न विक्रेत्यांसाठी अन्न हाताळणी प्रशिक्षण यशस्वी संपन्न
Nashik, Nashik | Nov 28, 2025 नाशिकमध्ये फिरत्या अन्न विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासन, महापालिका आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस, सातपूर येथे FOSTAC अन्न हाताळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. पाणीपुरी, भेळ, चायनीज, वडापाव, भजी, आईस्क्रीम विक्रेते अशा पाचशेहून अधिक विक्रेत्यांना नेस्लेच्या सामाजिक दायित्व निधीतून हे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला महापालिका उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, सहायक आयुक्त मनीष सानप यांची उपस्थिती होती.यावेळी विक्रेत्यांना परिसर स्वच्छता, सुरक्षित अन्न याबाबत सांगितले