ठाणे: दिवा येथून धक्कादायक व्हिडिओ आला समोर, धावत्या लोकल खालून निघाला वृद्ध व्यक्ती
Thane, Thane | Nov 8, 2025 दिवा रेल्वे स्थानकातून धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका धावत्या लोकल खाली एक व्यक्ती गेला होता आणि ती लोकल पुढे गेल्यानंतर सर्वांना ती व्यक्ती जिवंत राहिली असेल अशी अपेक्षा नव्हती. मात्र लोकल पुढे गेल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती उठून बसली त्यानंतर रेल्वे स्थानकात असलेले काही नागरिक त्याच्या मदतीला धावले आणि त्याला स्थानकात घेऊन गेले. तो सुखरूप असल्याचे पाहून सर्व नागरिकांना आश्चर्य वाटत असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.