विहामांडवा येथील जायकवाडी वसाहतीत अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपस्थिती लाभली यावेळी गावकऱ्यातर्फे मनोज जरांगे यांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले या दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी सप्ताह सुरू असलेल्या जायकवाडी वसाहत येथील ठिकाणी जाऊन उपस्थिती राहून दर्शन घेतले यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला