आर्वी: आर्वी नगरपालिकेसाठी दोन तारखेला निवडणूक ..शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
Arvi, Wardha | Nov 29, 2025 नगरपरिषद आर्वी सार्वत्रिक निवडणूक करिता 2डिसेंबर 2025 रोजी मतहोणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी पोलिसांनी सकाळी 11 वाजता रूट मार्च काढला.. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात आर्वी शहरांमध्ये ठाणेदार सचिन डेहनकर यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च काढण्यात आला यामध्ये चार अधिकारी 25 अंमलदार 90 होमगार्ड एक एस आर पी एफ तुकडी अशी उपस्थिती होती शहरातील प्रमुख मार्गाने हा रूट मार्च फिरला..