भद्रावती तालुक्यातील शेतमजूर व शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती यावर्षीच्या नापिकीमुळे अत्यंत खराब झाली आहे.विज वितरण कंपणीतर्फे विजबील भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे व विजबील न भरल्यास त्यांच्या जोडण्या कापल्या जात आहे.त्यामुळे त्यांना विजबील भरण्यासाठी पुरेसी मुदतवाढ देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तालुका कांग्रेस कमिटीतर्फे विज वितरण कार्यालयात सादर करण्यात आले आहे.