हिंगणघाट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्याला शहरात भाजपाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा
महाराष्ट्रचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हिंगणघाट शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ नयनाताई तुळसकर व सर्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येणार असून दुपारी दिड वाजता गोकुळधाम मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन होणार असल्याची माहिती आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दिली आहे..या सभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आजच संपूर्ण सभेचे तैयारी जोरात केली आहे.या सभेला शहरातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.